रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्याच वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांकडून चांगलाच फटका बसला. पहिल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३७५ धावांचं आव्हान ठेवलं. रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. परंतू हेजलवूडने ३ बळी घेत टीम इंडियाला दणके दिले. रोहितच्या अनुपस्थितीचा पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला चांगलाच फटका बसलेला दिसून आला. याचसाठी रोहितसा कसोटी मालिकेत खेळता यावं यासाठी बीसीसीआय विशेष प्लान आखण्याच्या तयारीत आहे.
रोहित शर्मा सध्या बंगळुरुस्थित NCA मध्ये आपल्या फिटनेसवर भर देण्याचं काम करतो आहे. ११ डिसेंबर रोजी रोहितची फिटनेस टेस्ट होणार असून यानंतर त्याच्या ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी संघातील सहभागाबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात जावा यासाठी विशेष प्लान करायला सुरुवात केली आहे.
“रोहितशी संबंधित सर्व सदस्यांना या गोष्टीची कल्पना देण्यात आली आहे. रोहितसाठी विशेष प्लान आखण्यात आला असून तो ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. रोहितच्या वडिलांची तब्येत खराब असल्यामुळे तो मुंबईत परतला होता. रोहितच्या वडिलांना कोविडची लागण झाली होती, प्रत्येकाला या समस्येविषयी माहिती नव्हती.” बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने मुंबई मिररला माहिती दिली. दरम्यान रोहितसाठी बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला क्वारंटाईन कालावधीचा नियम शिथील करता येईल का असं विचारलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2020 4:29 pm