03 June 2020

News Flash

रोहित, वॉर्नर ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम सलामीवीर – मूडी

महेंद्रसिंह धोनी आवडता कर्णधार

संग्रहित छायाचित्र

रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर हे ट्वेन्टी-२० क्रि के टमधील जगातील सर्वोत्तम सलामीवीर असल्याचे ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू टॉम मूडी यांनी शनिवारी सांगितले.

प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून कार्यरत असलेल्या ५४ वर्षीय मूडी यांनी चेन्नई सुपर किंग्ज हा आवडता इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघ तर महेंद्रसिंह धोनी आवडता कर्णधार असल्याचे नमूद केले.

‘‘ट्वेन्टी-२० क्रि के टमधील सर्वोत्तम सलामीवीरांची जोडी निवडणे आव्हानात्म्क होते, परंतु मी रोहित आणि वॉर्नरलाच प्राधान्य देईन. भारतात युवा गुणवत्ता मोठय़ा प्रमाणात आहे. यापैकी शुभमन गिलचा मी आवर्जून उल्लेख करीन,’’ असे मूडी यांनी सांगितले.

‘‘न्यूझीलंडचा कर्णधार के न विल्यम्सनकडे उपजत क्रि के ट नेतृत्वक्षमता आहे, तर रवींद्र जडेजा हा उत्तम भारतीय क्षेत्ररक्षक आहे,’’ असे मूडी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:01 am

Web Title: rohit warner twenty 20 cricket worlds best opener abn 97
Next Stories
1 करोनामय संकट!
2 डाव मांडियेला : ‘करोनाकोंडी’वर उतारा
3 युवराजचा रवी शास्त्रींना खोचक टोला, म्हणाला…
Just Now!
X