इंग्लंडचा भारत दौरा

भारताकडे एकापेक्षा एक दर्जेदार फलंदाजांचा भरणा असल्याने आगामी कसोटी मालिकेत आमच्या गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरेल, असे मत इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प यांनी व्यक्त केले.

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे प्रारंभ होत असून सध्या इंग्लंडचे खेळाडू विलगीकरणात आहेत. इंग्लंडविरुद्धच्या २०१४तील दौऱ्यावर कोहली सपशेल अपयशी ठरला होता. परंतु २०१६-१७ तसेच २०१८मधील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीनेच भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे कोहलीसह सर्व फलंदाजांसाठी आमच्याकडे रणनिती तयार आहे, असे थॉर्प यांनी सांगितले.

मेनन, चौधरी, शर्मा पंचांच्या भूमिकेत

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेसाठी नितीन मेनन, अनिल चौधरी आणि विरेंदर शर्मा हे पंचांच्या भूमिकेत दिसतील. जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेत स्वदेशी पंच नसावेत, असे ‘आयसीसी’ने प्रथम जाहीर केले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य देशांतील प्रवांसावर निर्बंध असल्याने भारताचेच पंच या मालिकेत पंचांची भूमिका बजावतील.