News Flash

Video: WWE सुपरस्टार रोमन रेन्सने ‘त्याची’ शौचालयात कोंडून केली धुलाई

... आणि रिंगमधली लढाई पोहोचली शौचालयापर्यंत

Video: WWE सुपरस्टार रोमन रेन्सने ‘त्याची’ शौचालयात कोंडून केली धुलाई

‘द रॉयल रंबल’ ही WWE मधील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा आहे. दर वर्षी होणाऱ्या या स्पर्धेत एक नवा सुपरस्टार प्रकाशझोतात येतो. मात्र यंदाची रॉयल रंबल गाजवली ती WWE मधील सध्याचा सर्वात घातक फायटर द रोमन रेन्स याने. त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला अक्षरश: शौचालयाच डांबून मारले.

WWE द रॉयल रंबलमधील पहिला सामना रोमन रेन्स आणि किंग कॉर्बिन यांच्यात झाला. हे दोघेही एकमेकांचे जुने प्रतिस्पर्धी आहेत. यापूर्वी झालेल्या अनेक सामन्यांमध्ये हातचलाखी करुन किंगने रोमनला हरवले आहे. परंतु यावेळी रोमनने किंगला फॉल काऊंट एनिवेअर मॅचचे आव्हान दिले. या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना रिंगमध्ये फाईट करण्याचे बंधन नसते. ते स्टेडिअममध्ये कुठेही जाऊन एकमेकांची धुलाई करु शकतात. शिवाय या प्रकारच्या सामन्यात कोसळलेल्या खेळाडूला उभे राहाण्यासाठी १० सेकंदांचा वेळ देण्यात येतो. मात्र या प्रकारच्या स्पर्धेत हातचलाखी फारशी करता येत नाही. आणि याचाच फायदा घेऊन रोमन रेन्स याने किंगसोबतचा आपला जुना हिशोब चुकता केला.

या दोघांमधील फाईट जवळपास पाऊण तास सुरु होती. अखेर रोमनने किंगला थेट शौचालयाच डांबले व तो दरवाजा तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताला आपला सुपरमॅन पंच मारुन सामना संपवला. या सामन्यात किंग जबरदस्त जखमी झाला. या सामन्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 7:50 pm

Web Title: roman reigns vs king corbin falls count anywhere match wwe royal rumble 2020 highlights mppg 94
Next Stories
1 VIDEO : रवी यादवची ऐतिहासक कामगिरी; करिअरच्या पहिल्याच षटकात घेतली हॅटट्रिक
2 संपत्तीच्या बाबतीत सेहवागच्या जवळपासही फिरकत नाही शोएब अख्तर, जाणून घ्या कोणाकडे किती संपत्ती ?
3 IPL 2020 : मुंबई इंडियन्सला पाचवं विजेतेपद मिळवण्याची संधी
Just Now!
X