News Flash

मेस्सीसोबतच्या तुलनेने कंटाळलो आहे- रोनाल्डो

रोनाल्डोला मेस्सीसोबत वारंवार होत असलेल्या तुलनेचा कंटाळा आला आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो

लिओनेल मेस्सीपेक्षा मी श्रेष्ठ असल्याची दर्पोक्ती करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मेस्सीसोबत वारंवार होत असलेल्या तुलनेचा कंटाळा आला आहे. त्याच्या जीवनपटावर आधारित येत असलेल्या ‘रोनाल्डो’ या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात तो बोलत होता. ‘‘माझी स्वत:ची शैली आहे आणि मेस्सीकडे त्याची. वारंवार तुलना करणाऱ्या व्यक्तींचा आम्ही आदर करतो आणि तुलना होणे हे स्वाभाविक आहे. लहान असल्यापासून ती होत आहे, हे माझ्या आणि मेस्सीबाबत बोलत नाही, परंतु शाळेत जाणारे विद्यार्थीही आमची चर्चा करतात. कोण अधिक हुशार आहे? कोण जलद आहे? हे स्वाभाविक आहे आणि आयुष्याचा भाग आहे,’’ असे मत रोनाल्डोने व्यक्त केले. मात्र, याला जोडूनच तो म्हणाला, ‘‘ही बाब माझ्यासाठी नवीन नाही आणि त्याचे आश्चर्यही वाटत नाही, परंतु काही वेळी या तुलनेचा कंटाळा येतो. कारण, प्रत्येक वेळी तेच प्रश्न, तीच चर्चा, वर्षांनुवष्रे तेच तेच.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2015 7:39 am

Web Title: ronaldo bored by comparisons of lionel messi
टॅग : Lionel Messi,Ronaldo
Next Stories
1 जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा : भारतीय खेळाडूंना अकरा पदके
2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा बंगालपुढे घरच्या मैदानावर विदर्भचे आव्हान
3 अंकिता रैनाला विजेतेपद
Just Now!
X