News Flash

रोनाल्डोचा दुहेरी धमाका!

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दुहेरी धमाक्यामुळे रिअल माद्रिदने रायो व्हॅलेकानोचा ३-२ असा पराभव केला. या विजयासह रिअल माद्रिदने स्पॅनिश लीग

| November 4, 2013 02:49 am

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दुहेरी धमाक्यामुळे रिअल माद्रिदने रायो व्हॅलेकानोचा ३-२ असा पराभव केला. या विजयासह रिअल माद्रिदने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतालिकेत बार्सिलोना आणि अ‍ॅटलेटिको माद्रिदनंतर तिसरे स्थान पटकावले.
काही दिवसांपूर्वी सेव्हिलावरील ३-७ अशा विजयात हॅट्ट्रिकची नोंद करणाऱ्या रोनाल्डोने तिसऱ्या मिनिटालाच रिअल माद्रिदचे खाते खोलले. त्यानंतर करीम बेन्झेमाने ३१व्या मिनिटाला दुसऱ्या गोलाची भर घातली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच गॅरेथ बॅलेच्या क्रॉसवर रोनाल्डोने दुसरा गोल करून बार्सिलोनाला ३-० असे आघाडीवर आणले. मात्र जोनाथन व्हिएरा याने दोन मिनिटांच्या अंतराने दोन गोल करून रायो व्हॅलेकानोच्या बरोबरीच्या आशा उंचावल्या. मात्र रायो व्हॅलेकानोला बरोबरी साधण्यात अपयश आले. दुसऱ्या सामन्यांत, रिअल सोसिएदादने ओसासुनाचा ५-० असा धुव्वा उडवला. सेल्टाने सेव्हिला संघावर १-० अशी मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 2:49 am

Web Title: ronaldo double sinks rayo sociedad win
टॅग : Ronaldo
Next Stories
1 दुखापतग्रस्त मॅक्क्युलमची बांगलादेश दौऱ्यातून माघार
2 शाब्दिक शेरेबाजीबद्दल जडेजाला दंड
3 जोकोव्हिचला पराभूत करण्याकडे फेडररचे लक्ष
Just Now!
X