लिस्टर सिटीचे क्लाऊडिओ सर्वोत्तम प्रशिक्षक; कार्ली लॉइड सर्वोत्तम महिला खेळाडू

सातत्याने गोल करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने ‘फिफा’ पुरस्कारावरही आपल्या नावाची मोहर उमटवली. महिनाभरापूर्वी बलॉन डी’ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या रोनाल्डोची फिफाने २०१६ वर्षांसाठीचा सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड केली. रिअल माद्रिद क्लब आणि पोर्तुगाल संघाचा तारणहार रोनाल्डोने समकालीन लिओनेल मेस्सीला मागे टाकत सरशी साधली. दंतकथासदृश कामगिरीसह इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावणाऱ्या लिस्टर सिटीचे प्रशिक्षक क्लाऊडिओ रॅनिरी यांना सवरेत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. अमेरिकेच्या कार्ली लॉइडला सवरेत्कृष्ट महिला फुटबॉलपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०१६ या वर्षांत रोनाल्डोने ४४ लढतींमध्ये ४२ गोल केले आणि १४ गोलसाठी साहाय्य केले. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम लढतीत निर्णायक पेनल्टीचे गोलमध्ये यशस्वी रूपांतर केले. क्लब विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हॅट्ट्रिक नोंदवली. युरो २०१६ स्पर्धेत पोर्तुगालच्या जेतेपदापर्यंतच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. कारकीर्दीत चौथ्यांदा बलॉन डी’ओर पुरस्कारावर नाव कोरले.

[jwplayer lIbk7RZD]

‘‘मागील वर्ष हे माझ्यासाठी स्वप्नवत ठरले. पोर्तुगालसाठी युरो चषक जिंकून देता आला, याचे समाधान अनोखे आहे. चॅम्पियन्स लीग आणि क्लब विश्वचषकाच्या अंतिम लढतीचा क्षण विसरू शकत नाही. संघाच्या विजयात योगदान देऊ शकल्याचा आनंद आहे,’’ असे रोनाल्डोने सांगितले. मतदानात रोनाल्डोला सर्वाधिक ३४.५४ टक्के मते मिळाली. २६.४२ टक्क्यांसह मेस्सीने द्वितीय, तर अँटोनिओ ग्रिइझमनला ७.५३ टक्क्यांसह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

फिफा आणि फ्रान्स फुटबॉल मासिकातर्फे गेली सहा वर्षे बलॉन डी’ओर पुरस्कार दिला जातो. मात्र गेल्या वर्षीपासून फिफाने फ्रान्स फुटबॉलशी असलेली संलग्नता तोडत स्वतंत्रपणे पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. नव्या स्वरूपाच्या या पुरस्काराचा रोनाल्डो पहिलाच मानकरी ठरला. राष्ट्रीय संघांचे कर्णधार आणि व्यवस्थापक, मोजके पत्रकार यांनी केलेले मतदान आणि ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे पुरस्कारार्थीची निवड करण्यात आली. रोनाल्डो आणि मेस्सी यांनी एकमेकांना मतदान केले नाही.

जर्मनीच्या सिल्व्हिआ नेइड यांची सवरेत्कृष्ट महिला प्रशिक्षक म्हणून निवड झाली. पेनांग क्लबच्या मोहम्मद फैझ सुब्रीला वर्षांतील सवरेत्कृष्ट गोल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लिव्हरपूल आणि बोरुसिया डॉर्टमंडच्या चाहत्यांना सवरेत्कृष्ट चाहते पुरस्काराने गौरवण्यात आले. दुर्दैवी अपघातात सहकारी गमावणाऱ्या कोलंबियातील क्लब अ‍ॅटलेटिको नॅसिनल संघाला खेळभावना जपणूक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

फिफाने निवडलेला संघ

लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, आंद्रेस इनेइस्टा, टोनी क्रुस, ल्युक मॉड्रिक, मार्केलो व्हिएइरा, सर्जिओ रामोस, गेरार्ड पिक, डॅनी अल्वेस, मॅन्युअल नेयुर

[jwplayer ncqbZxfX]