News Flash

रोनाल्डोच्या पुनरागमनाने पोर्तुगालमध्ये उत्साह

पोर्तुगाल संघाचा आधारस्तंभ असलेला दुखापतग्रस्त ख्रिस्तियानो रोनाल्डो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतल्याने संघात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

| June 10, 2014 12:37 pm

पोर्तुगाल संघाचा आधारस्तंभ असलेला दुखापतग्रस्त ख्रिस्तियानो रोनाल्डो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतल्याने संघात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या आर्यलडविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्याने रोनाल्डोने पुनरागमन केल्याने संघाने नि:श्वास सोडला आहे. दुखापतीमुळे रोनाल्डोला दोन सराव सामने खेळता आले नव्हते. त्यामुळे पोर्तुगालचा संघ धास्तावलेला होता. पण तो तंदुरुस्त झाल्याचे पोर्तुगालच्या संघाने अधिकृतरीत्या जाहीर केले असून विश्वचषकासाठी तो सज्ज असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत रोनाल्डो नसताना पोर्तुगालला चांगली कामगिरी करता आलेली नाही. रोनाल्डोने ११० सामन्यांमध्ये ४९ गोल करत संघाला मोठे यश मिळवून दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2014 12:37 pm

Web Title: ronaldo return boost for portugal
टॅग : Ronaldo
Next Stories
1 क्रमवारीत सानिया सहाव्या स्थानावर
2 विल्यमसनचे नाबाद शतक
3 ब्राझिलचा माजी फुटबॉलपटू फर्नाडोचे अपघाती निधन
Just Now!
X