News Flash

रोनाल्डोने रेयालचा पराभव टाळला

८७व्या मिनिटाला रोनाल्डोने टाचेच्या साहाय्याने केलेल्या गोलमुळे रेयालने ही लढत १-१ अशी बरोबरीत सोडवली.

ख्रिस्तियानो रोनाल्डो

माद्रिद : ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा अखेरच्या क्षणी गोल करत रेयाल माद्रिदचा पराभव टाळला. ला लिगा फुटबॉलमध्ये बुधवारी अ‍ॅथलेटिक बिलबाओने बलाढय़ रेयाल माद्रिदला त्यांच्याच घरच्या मैदानावर झुंजवले. ८७व्या मिनिटाला रोनाल्डोने टाचेच्या साहाय्याने केलेल्या गोलमुळे रेयालने ही लढत १-१ अशी बरोबरीत सोडवली.

संपूर्ण सामन्यात आक्रमक खेळ करूनही रेयालला गोल करण्यात यश प्राप्त होत नव्हते. बिलबाओचा गोलरक्षक केपाने रेयालचे आक्रमण अचूकपणे थोपवले. पहिल्या सत्रात रेयालकडून जवळपास १२ गोलप्रयत्न झाले. मात्र बिलबाओने १४व्या मिनिटाला इनॅकी विलियम्सच्या गोलच्या जोरावर १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात रेयालने आक्रमणाची धार अधिक तीव्र केली, परंतु त्याचा फार फायदा झाला नाही. अखेरीस ८७व्या मिनिटाला ल्युका मॉड्रीकच्या पासवर रोनाल्डोने उजव्या पायाच्या टाचेने चेंडूला दिशा दिली आणि तो सहज गोलजाळीत विसावला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:45 am

Web Title: ronaldo scores with backheel flick saves madrid from loss in laliga
Next Stories
1 राष्ट्रकुल स्पर्धाचे ‘अच्छे दिन’
2 ड्वेन ब्राव्होच्या ‘रन द वर्ल्ड’ मध्ये नाशिकचा सचिन खैरनार
3 बातमी देताना काहीतरी शरम बाळगा, सुवर्णकन्या मनू भाकेरने फटकारलं