ख्रिस्तियानो रोनाल्डो तसेच युव्हेंटसच्या काही अव्वल फुटबॉलपटूंनी करोनाविषयक नियमांचा भंग केल्याने त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

युव्हेंटस संघातील दोन खेळाडू करोनाबाधित आढळून आले आहेत. मात्र तरीही आपल्या करोना चाचणीचे अहवाल येण्याआधीच अनेक फुटबॉलपटू कोणतीही कल्पना न देता युव्हेंटस संघाचे हॉटेल सोडत आपापल्या राष्ट्रीय संघात सामील झाले होते. रोनाल्डोसह पावलो डायबला, हुआन कुआड्राडो आणि रॉड्रिगो बेंटॅनकर यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे.

‘‘अनेकांनी विलगीकरण कक्ष सोडताना कोणतीही कल्पना दिलेली नाही, हे युव्हेंटसने आम्हाला कळवले आहे,’’ असे तुरिनचे आरोग्य विभागाचे संचालक रॉबेटरे टेस्टी यांनी सांगितले.