वृत्तसंस्था, पोटरे

‘यूएफा’ नेशन्स लीग फु टबॉल स्पर्धेतील क्रोएशियाविरुद्धचा सामना स्टेडियममध्ये बसून पाहणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मुखपट्टी न घातल्याबद्दल ताकीद देण्यात आली. पोर्तुगालने जोआओ कॅ न्सेलो, दिओगो जोटा, जोआओ फे लिक्स आणि आंद्रे सिल्वा यांच्या गोलमुळे ही लढत ४-१ अशी जिंकली. पायाच्या बोटाला झालेल्या संसर्गामुळे युव्हेंट्सचा अव्वल खेळाडू रोनाल्डो या सामन्यात खेळू शकला नाही. स्टेडियममध्ये बसून सामना पाहणाऱ्या रोनाल्डोने करोनाविषयक नियमांचे उल्लंघन के ल्याप्रकरणी एका महिला अधिकाऱ्याने त्याला मुखपट्टी घालण्याची सूचना केली. रोनाल्डोलाही आपली चूक उमगल्यानंतर त्याने मुखपट्टी घालूनच संपूर्ण सामना पाहिला.