दिल्ली : जुवेंटसचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला आपले मैदानावरील असभ्य वर्तन चांगलेच भोवणार असे दिसत आहे. चॅम्पियन्स लीगच्या राउंड ऑफ १६ च्या सामन्यावेळी रोनाल्डोने हॅट्ट्रिक केली. या हॅट्ट्रिकवेळीच्या एका गोलच्या सेलिब्रेशनवेळी त्याने असभ्य वर्तन केले याच प्रकरणाची शिस्तपालन अधिकारी चौकशी करणार आहेत. चॅम्पियन्स लीगच्या राउंड ऑफ १६मधील जुवेंटस आणि अटलेटिको माद्रिद यांच्यातील सामन्यादरम्यान सर्वप्रथम अटलेटिको

माद्रिदचे कोच दिगो सिमेओन यांनी पहिला त्यांच्या संघाने पहिला गोल मारल्यानंतर प्रेक्षकांकडे पाहून आपल्या ट्राउजरमध्ये हात घालत असभ्य हावभाव केले. त्यानंतर रोनल्डोने या गोलची परत फेड केली त्याने गोलची हॅट्ट्रिक केली. पण, या हॅट्ट्रिकमधील एक गोल मारल्यानंतर रोनाल्डोनेही दिगोंसारखेच असभ्य हावभाव केले. या प्रकरणी अटलेटिको माद्रिदचे कोच  दिगो सिमेओन यांना २० हजार युरो दंड झाला आहे. तर रोनाल्डोची या प्रकरणी चौकशी सुरु आहे. या प्रकरणी युनियन ऑफ फुटबॉल असोसिएशनच्या शिस्त नियम ५५ अन्वये अटलेटिको माद्रिदचे आणि जुवेंटसची चौकशी सुरु आहे.