News Flash

कोणत्या ग्रहावरुन आला आहेस ? रोनाल्डोचा गोल पाहून दिग्गजही भारावले

रोनाल्डो आता मंगळ ग्रहावरील लोकांनाही फुटबॉल शिकवू शकतो

चॅम्पिअन्स लीगदरम्यान रिअल मेड्रिड आणि ज्युवेंटस यांच्यातील सामन्यादरम्यान ख्रिस्तियानो रोनाल्डे याने केलेला जबरदस्त गोल पाहून चाहते भारावले आहेत. त्याची स्तुती करताना चाहते थकत नाहीयेत. फुटबॉलचे चाहते हा आतापर्यंतच्या जबरदस्त गोलपैकी एक आहे असा दावा करत आहेत. रोनाल्डोने बायसिकल किक मारत हा गोल केला होता. रोनाल्डोच्या या गोलचं कौतुक फक्त त्याचे चाहते नाही तर अनेक दिग्गजही करत आहेत. प्रसारमाध्यमांमध्येही या गोलची चर्चा सुरु असून, हा अचंबित करणार गोल होता असं अनेकांनी म्हटलं आहे.

बास्केटबॉलचा दिग्गज खेळाडू लेबॉन जेम्स यानेही रोनाल्डोच्या या गोलचं कौतूक केलं आहे. बुधवारी डेली एस्टोरिअनने रोनाल्डोच्या गोलचं कौतूक करताना ‘व्हॉट प्लॅनेट डिड यू कम फ्रॉम’ म्हणजेच ‘कोणत्या ग्रहावरुन आला आहेस’ अशी हेडिंग दिली. समाचार पत्रने रोनाल्डोला को ‘डी स्टेफानो 2.0’ चा खिताब देत रिअल मेड्रिड १९६२ पासून एकदाही ज्युवेंटसविरोधात हारलेली नाही यावर लक्ष केंद्रित केलं. १९६२ मध्ये रिअल मेड्रिडचे खेळाडू अल्फ्रेडो स्टेफानो यांनी सामन्यात एकमात्र गोल करत विजय मिळवून दिला होता. अल्फ्रेडो स्टेफानो यांची गणना महान खेळाडूंमध्ये केली जाते.

पण सर्वात वेगळ्या पद्धतीने स्तुती केली आहे ते रोनाल्डोचा माजी सहकारी अल्वारो अॅर्बेलोआ याने. त्याने म्हटलं आहे की, रोनाल्डो आता मंगळ ग्रहावरील लोकांनाही फुटबॉल शिकवू शकतो. जमिनीवर त्याने सर्व प्राप्त केलं आहे. जिदानने तर आपल्याला रोनाल्डोने मिळवलेलं यश पाहून ईर्ष्या वाटत असल्याचं म्हटलं आहे.

रोनाल्डोच्या मदतीने रिअल मेड्रिडने ज्युवेंटसचा ३-० ने पराभव केला. रोनाल्डोने पहिला गोल तिस-या मिनिटालाच केला होता, यानंतर शेवटच्या मिनिटांत त्याने दुसरा गोल केला. या सत्रात त्याचे १४ गोल झाले आहेत. चॅम्पिअन्स लीगमध्ये सलग दहा सामन्यात गोल करणारा रोनाल्डो पहिला खेळाडू ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 8:57 pm

Web Title: ronaldos goal surprise his fans as well as football world
Next Stories
1 सुरेश रैनाचे काश्मीर कनेक्शन तुम्हाला माहित आहे का ?
2 आम्ही काश्मीरमध्ये समोसे तळायला बसलेलो नाही, शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला
3 शाहिद आफ्रिदीच्या प्रश्नावर कपिल देव भडकलेच, कोण आहे तो ?
Just Now!
X