11 August 2020

News Flash

सेरी ए फुटबॉल स्पर्धा : रोनाल्डोचा अप्रतिम गोल, युव्हेंटसचा सलग तिसरा विजय

जिनोआवर ३-१ दमदार विजय

संग्रहित छायाचित्र

नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने २२ यार्डावरून केलेल्या अप्रतिम गोलमुळे युव्हेंटसला सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद करता आली. युव्हेंटसने पुढील हंगामात स्थान टिकवण्यासाठी धडपडत असलेल्या जिनोआवर ३-१ असा दमदार विजय मिळवला.

याबरोबरच लॅझियोवर चार गुणांची आघाडी मिळवत विक्रमी सलग नववे विजेतेपद पटकावण्यासाठी युव्हेंटस दावेदार आहे. या स्पर्धेत सलग तीन विजयांत रोनाल्डोच्या गोलांप्रमाणे पावलो डिबालाचेही योगदान आहे. डिबालाने ५०व्या मिनिटाला तर रोनाल्डोने ५६व्या मिनिटाला गोल केला. सामन्यातील तिसरा गोल डग्लस कोस्टाने ७३व्या मिनिटाला नोंदवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 12:11 am

Web Title: ronaldos superb goal juventus third win in a row abn 97
Next Stories
1 भारतात २०२७ची आशिया चषक फुटबॉल स्पर्धा?
2 शशांक मनोहर यांचा ICC अध्यक्षपदाचा राजीनामा
3 ‘हे’ चालतं, मग धोनीच्या ‘त्या’ ग्लोव्ह्जला विरोध का केला?; नेटकरी ICC वर भडकले…
Just Now!
X