13 August 2020

News Flash

न्यूझीलंडच्या विजयात टेलर चमकला

टेलरने २९ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ४८ धावा केल्या.

(संग्रहित छायाचित्र)

 

श्रीलंका-न्यूझीलंड ट्वेन्टी-२० मालिका

रॉस टेलरच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवला.

कुशल मेंडिसच्या (५३ चेंडूंत ७९ धावा) फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने ४ बाद १७४ धावा केल्या. मेंडिसने निरोशान डिक्वेलाच्या (३३) साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ६३ धावांची भागीदारी रचली.

न्यूझीलंडची ३ बाद ३९ अशी अवस्था झाली असताना टेलरने संघाचा डाव सावरला आणि १९.३ षटकांत १७५ धावांचे लक्ष्य पेलण्यात सिंहाचा वाटा उचलला. टेलरने २९ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ४८ धावा केल्या. त्याने कॉलिन डी ग्रँडहोमच्या (४४) साथीने चौथ्या गडय़ासाठी ७९ धावांची भागीदारी रचली.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : २० षटकांत ४ बाद १७४ (कुशल मेंडिस ७९, निरोशान डिक्वेला ३३; टिम साऊदी २/२०) पराभूत वि. न्यूझीलंड : १९.३ षटकांत ५ बाद १७५ (रॉस टेलर ४८, कॉलिन डी ग्रँडहोम ४४; वनिंदू हसरंगा २/२१, लसिथ मलिंगा २/२३)

* सामनावीर : रॉस टेलर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 12:51 am

Web Title: ross taylor new zealand victory abn 97
Next Stories
1 अपूर्वी-दीपकला सुवर्ण
2 बॅलेचा आविष्कार!
3 हरयाणा स्टीलर्सची पुणेरी पलटणवर मात
Just Now!
X