05 July 2020

News Flash

IPL 2020 : RCB च्या ताफ्यात नवीन सदस्य, अशी कामगिरी करणारा पहिला संघ

खेळाडूंच्या तंदुरुस्तीसाठी RCB चं महत्वाचं पाऊल

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आपल्या प्रशिक्षण वर्गात एका नवीन सदस्याची भरती केली आहे. नवनीता गौतम या संघाच्या मसाज थेरपिस्ट म्हणून काम पाहणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात प्रशिक्षण वर्गात महिलांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. RCB ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात घोषणा केली आहे.

आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला एकही विजेतेपद पटकावता आलेलं नाहीये. एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता, मात्र त्याला विजेतेपद पटकावण्यात अपयश आलं होतं. नवनीता गौतम यांनी याआधी अनेक राष्ट्रीय क्रीडा संघ आणि बास्केटबॉल संघांच्या मसाज थेरपिस्ट म्हणून काम केलं आहे. त्यामुळे आगामी हंगामात बंगळुरुचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2019 8:28 am

Web Title: royal challengers bangalore appoint female support staff member first in ipl psd 91
टॅग Rcb
Next Stories
1 Ind vs SA : रांची कसोटीत महेंद्रसिंह धोनी हजर राहणार
2 प्रो कबड्डी  लीग : धरमराजच्या तंदुरुस्तीची भिस्त खांद्यावरच्या बॅगेत..
3 गांगुली भारतीय क्रिकेटला उच्च स्तरावर नेईल!
Just Now!
X