10 August 2020

News Flash

कोहलीची कमाल, बंगळुरू विजयी

विराट कोहलीच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्सवर २४ धावांनी विजय मिळवला. धुवांधार पावसामुळे हा सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात

| May 20, 2013 02:27 am

विराट कोहलीच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्सवर २४ धावांनी विजय मिळवला. धुवांधार पावसामुळे हा सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात आला. बंगळुरूने ८ षटकांत तब्बल १०६ धावा फटकावल्या. कोहलीने २९ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५६ धावा केल्या. ख्रिस गेलने १३ चेंडूंत ४ षटकारांच्या साह्य़ाने २८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना चेन्नईला ८२ धावांचीच मजल मारता आली. त्यांनी ठरावीक अंतराने विकेट्स गमावल्या. मुरली विजयने सर्वाधिक ३२ धावा केल्या. झहीर खान अवघ्या १७ धावांत ४ बळी टिपले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2013 2:27 am

Web Title: royal challengers bangalore won 2
टॅग Ipl,Sports
Next Stories
1 सिर्फ देखनेका नहीं, पैसा भी कमानेका..
2 स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी तिघांना औरंगाबादमध्ये अटक
3 मनीषच्या अटकेनंतर विदर्भातील क्रिकेट व सट्टा वर्तुळ हादरले
Just Now!
X