News Flash

VIDEO : कॅमेरा चालूच राहिला, अन्…

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज राहुल तेवतियाचा व्हिडिओ व्हायरल

राहुल तेवतिया

राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू राहुल तेवतियाचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राजस्थान रॉयल्सने (आरआर) ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हॉटेलच्या खोलीत राहून तेवतिया आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत आहे.

क्वारंटाइन कालावधीत राहुल आपल्या खोलीत काय करत आहे, हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. खोलीतील हा कॅमेरा चालू असल्याची राहुलला कल्पना नाही, असे संघाने सांगितले. राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल आपल्या खोलीत वेळ घालवण्यासाठी प्रथम फोनवर बोलतो, त्यानंतर तो व्यायाम करतानाही दिसत आहे.

 

याशिवाय राहुल फलंदाजीचाही सराव करताना दिसत आहे. ”राहुलला वाटते की कोणीही त्याला पाहत नाही”, असे राजस्थान रॉयल्सने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

राहुलची मागील हंगामात चमकदार कामगिरी

मागील हंगामात राहुलने चमकदार कामगिरी केली. यावेळी देखील त्याच्याकड़ून तशाच पद्धतीच्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. राहुल तेवतियाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 14 सामने खेळले आहेत. यात त्याने 255 धावा केल्या आहेत. शिवाय तेवतियाने आयपीएलमध्ये 10 बळीही नोंदवले आहेत. मागील वर्षी तेवतियाच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. तेवतियाने 31 चेंडूत 53 धावा चोपत पंजाबचा गोलंदाज शेल्डन कॉट्रेलच्या एका षटकात 5 षटकार ठोकले होते.

आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्स संघ 12 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2021 10:50 am

Web Title: rr batsman rahul tewatia forgot to turn off the camera adn 96
टॅग : Rajasthan Royals,Rr
Next Stories
1 KKRच्या ‘त्या’ फलंदाजाचा दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल आला समोर
2 “CSK प्लेऑफआधीच बाहेर पडल्यास आश्चर्य वाटणार नाही”, भारताच्या माजी क्रिकेटपटूचं भाकित!
3 IPL 2021: धोनीसोबतच्या फोटोवर सुरेश रैनाने केली ‘हृदयस्पर्शी’ कमेंट, चाहते झाले फिदा!
Just Now!
X