News Flash

RR vs DC : संजू सॅमसनची पुन्हा कमाल; शिखर धवनचा घेतला अफलातून झेल! व्हिडीओ व्हायरल

संजू सॅमसनच्या झेलचं सोशल मीडियावर कौतुक

सौजन्य- सोशल मीडिया

आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. पंजाबविरुद्ध आक्रमक खेळी करत त्याने या आयपीएल पर्वातलं पहिलं शतकं झळकावलं. त्याने ६३ चेंडूत ११९ धावांची झुंजार खेळी केली. या खेळीमध्ये १२ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मात्र यावेळी त्याने क्षेत्ररक्षणात कमाल करुन दाखवली आहे. शिखर धवनचा अफलातून झेल घेत कौतुकास पात्र ठरला आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात संजू सॅमसननं अप्रतिम झेल पकडला. जयदेव उनडकटच्या गोलंदाजीवर शिखर धवननं चेंडू मागे मारला. मात्र कर्णधार संजूने ही संधी दवडली नाही आणि अप्रतिम झेल पकडला. शिखरने ११ चेंडुत ९ धावा केल्या त्यात एका चौकाराचा समावेश आहे. हा झेल संजूच्या हातून सुटला असता तर मात्र शिखर धवनने मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतला असता. याची पूर्णपणे कल्पना असल्यानेच संजू सॅमसननं त्याला संधी दिली नाही. अप्रतिम झेल पकडत धवनला तंबूत पाठवलं. संजू सॅमसनच्या झेलचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. फ्लाईंग सॅमसन नावानं त्याला सोशल मीडियावर उपमा दिल्या जात आहेत.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या षटकापासून राजस्थानच्या गोलंदाजांनी धावसंख्या रोखण्यावर भर दिला आहे. चेतन सकारिया आणि जयदेव उनडकट यांनी चांगली गोलंदाजी केली. जयदेवने पहिल्या दोन षटकात ७ धावा देत दोन गडी बाद केले. पहिल्यांदा पृथ्वी शॉला डेविड मिलरच्या हाती झेल देऊन बाद केलं. तर शिखर धवन त्याच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारण्याच्या नादात संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. जयदेवची गोलंदाजी चालत असल्याने संजूने त्याला पुन्हा तिसरं षटक दिलं. त्या षटकातही जयदेवनं अजिंक्य रहाणेला बाद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 8:15 pm

Web Title: rr captain sanju samson caught catch of shikhar dhawan rmt 84
Next Stories
1 IPL 2021 : हर्षल पटेलला ‘त्या’ बॉलनंतरही थांबवलं का नाही? वॉर्नर भडकला, पण हेड कोचने खरा नियम सांगितला!
2 RR vs DC IPL 2021 : चुरशीच्या सामन्यात राजस्थानचा दिल्ली कॅपिटल्सवर विजय!
3 दिल्लीविरुद्ध संजू सॅमसनची सिंहगर्जना! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Just Now!
X