08 August 2020

News Flash

करोनामुक्तीनंतर ऑलिम्पिक पात्रतेचा विचार!

टाळेबंदीच्या कालखंडात धावपटू हिमा दासचा सायकलिंग, क्रिकेटचा सराव

| July 13, 2020 01:57 am

टाळेबंदीच्या कालखंडात धावपटू हिमा दासचा सायकलिंग, क्रिकेटचा सराव

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकसाठी स्थान निश्चित करता आले नसले तरी भारताची अव्वल धावपटू हिमा दासला मात्र त्याची पर्वा नाही. ऑलिम्पिक पात्रतेच्या विचाराने तिची झोप उडाली नसून सध्या तिने सायकल आणि क्रिके ट खेळत सरावावर भर दिला आहे. करोनामुक्तीनंतर ऑलिम्पिक पात्रतेकडे पाहू, असा निर्धार हिमाने व्यक्त के ला.

करोनामुळे सध्या कोणत्याही स्पर्धा नसल्यामुळे हिमा दासने मध्यम स्वरूपाच्या सरावावर लक्ष के ंद्रित के ले आहे. घामाच्या धारांवर मात करण्यासाठी तिने धावण्याच्या व्यतिरिक्त सराव सुरू ठेवला आहे. ‘‘सध्या कोणत्याही स्पर्धा होणार नसल्यामुळे मी एकदम हलक्या स्वरूपाचा किं वा कठोर सराव करत नाही. शारीरिक तंदुरुस्तीइतकाच सराव मी करत आहे. पतियाळामध्ये उष्ण वातावरण असल्यामुळे आम्ही पहाटे सराव करत आहोत. संध्याकाळी सायकलिंग किं वा क्रिके टच्या चेंडूने गोलंदाजी करण्याचा सराव आम्ही करत आहोत,’’ असे हिमाने सांगितले.

‘‘शक्य होईल तितका जीवनाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न मी करत आहे. सकारात्मक आणि आनंदी राहणे हाच माझ्या जीवनाचा मूलमंत्र आहे. ऑलिम्पिक पात्रतेची मी फारशी चिंता करत नाही. त्यामुळे फक्त दडपणात वाढ होते. ऑलिम्पिक पात्रतेसाठी अद्याप एका वर्षांचा कालावधी असल्यामुळे करोनाचे संकट दूर झाल्यावर त्याचा विचार करता येईल. १ डिसेंबरपासून अ‍ॅथलेटिक्सच्या मोसमाला सुरुवात होणार असून त्यानंतर पात्रता स्पर्धामध्ये मी ऑलिम्पिकसाठीचे स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असेन,’’ असेही तिने सांगितले.

‘धिंग एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जाणारी हिमा ही जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिला महिला धावपटू ठरली आहे. राष्ट्रीय स्पर्धेतही ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तिने ५०.७९ सेकं द अशी वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर के ला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तिला अनेक स्पर्धापासून दूर राहावे लागले आहे. याच दुखापतीमुळे तिला भविष्यात ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होता येणार नाही, त्यामुळेच ती २०० मीटर शर्यतीकडे वळली, अशीही चर्चा आहे.

याविषयी विचारले असता हिमा म्हणाली, ‘‘पाठीच्या दुखापतीतून मी सध्या सावरत आहे. प्रशिक्षकांच्या सांगण्यानुसार काहीही करण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे मी कोणत्या शर्यतीत सहभागी व्हायचे, याचा निर्णय प्रशिक्षकच घेतील.’’

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने १२ सप्टेंबरपासून देशांतर्गत स्पर्धाना सुरुवात करण्याचे ठरवले आहे. पण देशातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, सद्यस्थितीला त्याबाबत अनिश्चितेचे सावट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 1:57 am

Web Title: runner hima das practices cycling and cricket during the lockdown period zws 70
Next Stories
1 सचिन-द्रविड-लक्ष्मण कणखर नव्हते का?
2 दोन आठवडय़ांचा विलगीकरणाचा काळ खेळाडूंसाठी निराशाजनक!
3 ला लिगा फुटबॉल : बार्सिलोनाची चिवट झुंज सुरूच
Just Now!
X