News Flash

माखन सिंगच्या पत्नीला दोन लाखांची मदत

आशियाई क्रीडा स्पर्धेत (१९६२) चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक मिळविणारे माखन सिंग या दिवंगत धावपटूंच्या पत्नी सुलींदर कौर यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन

| August 29, 2013 04:43 am

आशियाई क्रीडा स्पर्धेत (१९६२) चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक मिळविणारे माखन सिंग या दिवंगत धावपटूंच्या पत्नी सुलींदर कौर यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन लाख रुपयांची मदत दिली.
क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले, ‘‘सुलिंदर कौर या हलाखीचे जीवन जगत असल्याचे वृत्त कळल्यानंतर त्यांना राष्ट्रीय क्रीडापटू कल्याणकारी निधीतून ही मदत देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक मिळविणारे सर्वच खेळाडू देशासाठी अभिमानास्पद व्यक्ती आहेत. त्यांचा आदर्श पुढे ठेवत अन्य खेळाडूंनी देशाचा नावलौकिक वाढवावा. कौर यांना आम्ही आमच्या अधिकारात शक्य तेवढी मदत केली आहे. आम्ही यापूर्वी २००९मध्येही त्यांना तीन लाख रुपयांचे साहाय्य केले होते. आम्ही पंजाब शासनालाही कौर यांना जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन केले आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2013 4:43 am

Web Title: runner makhan singh wife get rs 2 lakh help
टॅग : Sports Minister
Next Stories
1 बीसीसीआयच्या बैठकीला श्रीनिवासन हजर राहण्याची शक्यता -रवी सावंत
2 संघात परतण्यासाठी वीरूची खडतर तयारी
3 ‘स्पर्धेत खेळा, पण निवडणुका चुकवू नका’- सेबॅस्टियन गिलोट
Just Now!
X