बचावातील त्रुटी दूर करण्यावर आमचा भर आहे. मात्र बदल एका रात्रीत घडत नाहीत, असे भारतीय हॉकी संघातील भरवशाचा खेळाडू रुपिंदर पाल सिंगने सांगितले. अँटवर्प, बेल्जियम येथे वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर रुपिंदर बोलत होता.
‘‘बेल्जियम स्पर्धेत बचाव अभेद्य करण्यावर आम्ही लक्ष देऊ. जिंकणे आणि हरण्यात ज्या छोटय़ा गोष्टी कमी पडत आहेत, त्या सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे. या गोष्टीमुळे प्रतिस्पर्धी संघ आमच्याविरुद्ध सहजतेने गोल करीत असत,’’ असे रुपिंदरने सांगितले. भारताची सलामीची लढत फ्रान्सशी होणार आहे.