शरीरसौष्ठव या खेळात यश संपादन करण्यासाठी वर्षांनुवर्षे खडतर तपस्या करावी लागते. पण विरारच्या रसेल दिब्रिटो याने अवघ्या नऊ महिन्यांच्या तपश्चर्येनंतर ‘मुंबई-श्री’ या प्रतिष्ठेच्या किताबाला गवसणी घातली आहे. बॉडी वर्कशॉपच्या रसेलने विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या सुशील मुरकर आणि नीलेश दगडे यांचे आव्हान मोडून काढत ‘मुंबई-श्री’ किताबावर नाव कोरले.

अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबवर भव्यदिव्य झालेल्या या स्पर्धेत फॉच्र्युन फिटनेसच्या रेणुका मुदलियार हिने महिलांच्या फिटनेस फिजिक प्रकारात ‘मिस-मुंबई’चा मान पटकावला. तर अमला ब्रह्मचारी हिने आपल्या पिळदार शरीरयष्टीने बाजी मारली. पुरुषांच्या फिजिक स्पोर्ट्स प्रकारात अरमान अन्सारी आणि आतिक खान विजेते ठरले.

dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Pune District, House Purchase, 23 percent Rise, Government, Collects Rs 620 Crore, Stamp Duty,
पुण्यात घरांची खरेदी जोरात! जाणून घ्या पुणेकरांची पसंती कशाला…

१२ गटात रंगलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत रसेलने आपल्या उत्तम शरीरसंपदेच्या जोरावर उपस्थितांची वाहवा मिळवली. विजेतेपदासाठी रसेल, सुशील आणि नीलेश यांच्यात कडवी चुरस रंगली होती, पण नीलेशला ‘प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू’ आणि सुशीलला उपविजेतपद घोषित झाल्यानंतर ‘मुंबई-श्री’चा विजेता रसेल होणार, यावर शिक्कामोर्तब झाले. प्रशिक्षक संजय चव्हाण यांच्या शिष्याने गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा ‘मुंबई-श्री’ किताब पटकावण्याची करामत केली आहे.

गटविजेते

* ५५ किलो : १. नीलेश कोळेकर (परब फिटनेस), २. नितीन शिगवण (पातुंड जिम), ३. ओंकार आंबोकर (बॉडी वर्कशॉप)

* ६० किलो : १. देवचंद गावडे (परब फिटनेस), २. प्रितेश गमरे (शिवाजी जिम), ३. विराज लाड (प्रभादेवी)

* ६५ किलो : १. उमेश गुप्ता (क्रिएटर जिम), २. तेजस भालेकर (परब फिटनेस), ३. शैलेश गायकवाड (ग्रेस फिटनेस)

* ७० किलो : १. मनोज मोरे (बाल मित्र जिम), २. आशीष लोखंडे (परब फिटनेस), ३. राहुल तर्फे (फॉच्र्युन फिटनेस)

* ७५ किलो : १. भास्कर कांबळे (ग्रेस जिं), २. सुजित महापात्रा (दांडेश्वर जिम), ३. अर्जुन कोंचीकोरवे (डीएन फिटनेस)

* ८० किलो : १. सुशील मुरकर (वीर सावरकर जिम), २. सुशांत रांजणकर (आरएम भट जिम), ३. गणेश पेडामकर (गुरुदत्त जिम)

* ८५ किलो : १. दीपक तांबिटकर (फॉच्र्युन फिटनेस), २. नितांत कोळी (मसल फॅक्टरी), ३. कुमार पेडणेकर (माय फिटनेस)

* ९० किलो : १. रसेल दिब्रिटो (बॉडी वर्कशॉप), २. अरुण नेवरेकर (स्टील बॉडी जिम), ३. उबेग रियाज पटेल (बेस्ट हाऊस जिम)

* ९० किलोवरील : १. नीलेश दगडे (परब फिटनेस), २. प्रसाद वालांत (बॉडी वर्कशॉप), ३. येशूप्रभू तलारी (हार्डकोअर जिम).

* विजेता : रसेल दिब्रिटो (बॉडी वर्कशॉप)

* महिला फिजिक फिटनेस : १. रेणुका मुदलियार (फॉच्र्युन फिटनेस), २. दीपाली ओगले (रिवाइंड जिम), ३. डॉ. मंजिरी भावसार (प्रो फिट)

* महिला शरीरसौष्ठव : १. अमला ब्रह्मचारी (फिटनेस वेअर हाऊस), २. डॉ. माया राठोड (ग्रेस फिटनेस), ३. श्रद्धा ढोके (माँसाहेब जिम)

अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत मला घडविणाऱ्या संजय चव्हाण यांनाच या विजयाचे श्रेय जाते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंता म्हणून काम करताना मला शरीरसौष्ठवाची आवड निर्माण झाली. आता हीच आवड जोपासून ‘महाराष्ट्र-श्री’ आणि ‘भारत-श्री’ जिंकण्याचे माझे स्वप्न आहे.

– रसेल दिब्रिटो