News Flash

माद्रिद खुली टेनिस स्पर्धा : सबालेंका अजिंक्य

आता २३ वर्षीय सबालेंका जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेणार आहे.

माद्रिद : बेलारुसच्या पाचव्या मानांकित आर्यना सबालेंकाने शनिवारी मध्यरात्री झालेल्या माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टीला नमवून महिला एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले.

दोन आठवडय़ांपूर्वी स्नायूंच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार करणाऱ्या सबालेंकाने दमदार खेळ करताना मातीच्या कोर्टवरील पहिले जेतेपद मिळवले. तिने बार्टीला ६-०, ३-६, ६-४ असे तीन सेटमध्ये पराभूत केले. सबालेकांचे हे कारकीर्दीतील एकूण १०वे जेतेपद ठरले. २५ एप्रिलला झालेल्या स्टुटगार्ट टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत बार्टीनेच सबालेंकाला धूळ चारली होती. मात्र या विजयासह तिने त्या पराभवाचा वचपा काढला. आता २३ वर्षीय सबालेंका जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेणार आहे. पुरुष एकेरीच्या सोमवारी होणाऱ्या अंतिम फेरीत जर्मनीचा अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि इटलीचा मॅटिओ बॅरेट्टिनी आमनेसामने येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 2:05 am

Web Title: sabalenka wins madrid open zws 70
Next Stories
1 भारताबाहेर विश्वचषकाचे आयोजन सोयीस्कर -चॅपेल
2 इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल: मँचेस्टर सिटीचे जेतेपद लांबणीवर
3 “भारत ही एक अशी जागा आहे, जिथे…”, मुंबई इंडियन्सच्या ट्रेंट बोल्टची पोस्ट व्हायरल
Just Now!
X