News Flash

नेयमारची दुखापत दुर्दैवी -सबेला

ब्राझीलचा अव्वल खेळाडू नेयमारला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण फुटबॉल विश्व हेलावले आहे. अर्जेटिनाचे प्रशिक्षक अलेजांड्रो सबेला यांनीही याबाबत चिंता प्रकट केली असून नेयमारची दुखापत ही विश्वचषकासाठी

| July 7, 2014 01:45 am

ब्राझीलचा अव्वल खेळाडू नेयमारला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण फुटबॉल विश्व हेलावले आहे. अर्जेटिनाचे प्रशिक्षक अलेजांड्रो सबेला यांनीही याबाबत चिंता प्रकट केली असून नेयमारची दुखापत ही विश्वचषकासाठी दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ‘‘ज्यांचे फुटबॉलवर नितांत प्रेम आहे आणि जे फुटबॉल जाणतात त्यांच्यासाठी नेयमारची दुखापत ही वाईट बातमी आहे,’’ असे सबेला यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘‘नेयमारची दुखापत ही विश्वचषकासाठी दुर्दैवी आहे, यापेक्षा जास्त किंवा कमी काहीही म्हणता येणार नाही. विश्वचषक उंचावणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि त्या दुखापतीमुळे महत्त्वाच्या सामन्यांना मुकावे लागणे, याला फक्त दुर्दैवच म्हणू शकतो.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:45 am

Web Title: sabella rues catastrophic neymar injury
Next Stories
1 बेल्जियमविरुद्धचा सामना सर्वोत्तम -मेस्सी
2 डी मारियाच्या दुखापतीमुळे अर्जेटिनाला धक्का
3 क्रीडा प्रक्षेपणाचा बहुरंगी बाजार