News Flash

‘शतकातील मौल्यवान कसोटीपटू’चं सौराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून कौतुक

विस्डेनतर्फे रविंद्र जाडेजाला देण्यात आला बहुमान

रविंद्र जाडेजा

प्रतिभावान डावखुरा अष्टपैलू रवींद्र जाडेजाची ‘विस्डेन’तर्फे २१व्या शतकातील सर्वाधिक मौल्यवान भारतीय कसोटीपटू म्हणून निवड करण्यात आली. ३१ वर्षीय जडेजाला ९७.३ गुण मिळाले. विश्वातील सर्वाधिक मौल्यवान कसोटीपटू म्हणून श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची निवड करण्यात आली. तर जाडेजाने या यादीत दुसरा क्रमांक मिळवला.

एका इंग्रजी संकेतस्थळाने पुरवलेल्या आकडेवारीच्या आधारे ‘विस्डेन’ने मौल्यवान खेळाडूंची यादी काढली असून यामध्ये खेळाडूंच्या संघाच्या विजयी सामन्यातील कामगिरीला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘‘भारतासाठी क्रिकेट खेळणे हे माझे स्वप्न होते. ‘विस्डेन’ने सर्वाधिक मौल्यवान खेळाडूसाठी माझी निवड केल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. माझे कुटुंबीय, संघसहकारी, प्रशिक्षक आणि चाहत्यांच्या पाठिंब्याशिवाय मी इथवर मजल मारू शकलो नसतो,’’ असे जाडेजा म्हणाला.

सौराष्ट्र क्रिकेट संघटनेनेदेखील जाडेजाचं कौतुक केलं. “जाडेजा हा एक अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो एक विश्वासार्ह खेळाडू म्हणून ओळखला जातो. फलंदाजी आणि गोलंदाजी तो उत्तम आहेत. त्याचसोबत फिल्डिंगमध्ये तो उत्कृष्ट आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये त्याने अनेकदा गेमचेंजरची भूमिका बजावली आहे”, अशा शब्दात संघटनेचे अध्यक्ष जयदेव शाह यांनी त्याचे कौतुक केले.

जाडेजाने ४९ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना १,८६९ धावा केल्या असून यामध्ये १ शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याशिवाय जडेजाने २१३ बळीसुद्धा मिळवले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 8:01 pm

Web Title: sac lauds ravindra jadeja on being team india most valuable player of the 21st century vjb 91
Next Stories
1 २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स?? कुमार संगकाराची ५ तास कसून चौकशी
2 Video : कहानी में ट्विस्ट! हार्दिकच्या ‘फ्लाईंग पुश-अप्स’ला विराटचं झकास उत्तर
3 आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर ! बीसीसीआय अधिकाऱ्याची माहिती
Just Now!
X