मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज(रविवार) एकदिवसीय क्रिकेट सामन्यांतून निवृत्ती घेत असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)कडे स्पष्ट केले. सचिन निवृत्त होत असल्याचे बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून कळवले आहे. “भारतासाठी विश्वचषक जिंकणे हे माझे स्वप्न होते आणि ते पुर्ण झाले, पुढील २०१५च्या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने संघ तयार होणे गरजेचे आहे. त्यामुळे मी एकदिवसीय क्रिकेट सामन्यातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक जिंकणाच्या संघात माझा समावेश होता ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे” असे सचिनेने स्पष्ट केले. त्याचबरोबर सचिने आपल्या हितचिंतकांचेही ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहे. ४६३ सामन्यांचा अनुभव गाठीशी बाळगणारा क्रिकेट मधला कोहीनूर हिरा आता एकदिवसीय सामन्यांत चमकणार नाही याचे दु:ख सचिनच्या चाहत्यांना होणार  मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये सचिन खेळणार असल्याने चाहत्यांना सचिनचे क्रिकेट दर्शन होत राहणार यावर समाधान मानावे लागेल.  तरी सचिनने आपल्या क्रिकेट करिअरला अर्ध विराम दिल्याने सचिनने ने योग्य निर्णय घेतल्याचेही वर्तवण्यात येत आहे.