अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या तिसऱ्या सामन्यात वॉर्न वॉरियर्सने चार विकेट्स राखून विजय मिळवला. त्यामुळे क्रिकेट ऑल-स्टार्स ट्वेन्टी-२० मालिकेत सचिन्स ब्लास्टर्सने ०-३ अशी हार पत्करली.
भारताचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (५६) आणि सौरव गांगुली (५०) यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर सचिन्स ब्लास्टर्सने २० षटकांत ५ बाद २१९ धावा केल्या. वॉर्न वॉरियर्सने फक्त एक चेंडू शिल्लक असताना ६ बाद २२४ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. कुमार संगकारा (४२), रिकी पाँटिंग (४३) आणि जॅक कॅलिस (४७) यांनी यात महत्त्वाचे योगदान दिले. कॅलिस आणि पाँटिंग यांनी सहाव्या विकेटसाठी ६.१ षटकांत ८८ धावांची भागीदारी केली. अखेर वॉर्नने षटकार खेचून संघाचा विजय साजरा केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2015 2:34 am