29 September 2020

News Flash

सचिनने निवृत्तीपासून रोखले होते – सेहवाग

भारतीय संघातून २००७ साली मला बाहेर काढले होते,

भारतीय संघातून २००७ साली मला बाहेर काढले होते, त्या वेळी मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पण त्या वेळी सचिनने मला निवृत्तीचा निर्णय घेण्यापासून थांबवले, असे मत नुकतीच निवृत्ती जाहीर केलेला भारताचा माजी तडफदार सलामीवीर वीरेंद्र सेहवाने सांगितले.

‘‘कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचल्यावर प्रत्येक खेळाडू निवृत्तीचा निर्णय घेत असतो. २००७ साली मला संघात स्थान देण्यात आले नव्हते, तेव्हा मी निवृत्तीचा निर्णय घेतला होता, पण सचिनने मला त्या वेळी थांबवले,’’ असे सेहवाग म्हणाला.
निवृत्ती घेण्याबाबत सेहवागला निवड समितीने न सांगता थेट संघातून बाहेर केले होते. याबाबत सेहवाग म्हणाला की, ‘‘ २०१३ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या वेळी निवड समितीने मला काहीही विचारले नाही. त्यांनी जर मला विचारले असते तर तेव्हाच मी निवृत्तीचा निर्णय घेतला असता.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 7:47 am

Web Title: sachin deny to take retirement sehwag
टॅग Sehwag
Next Stories
1 विम्बल्डन जेतेपदाने आयुष्यच बदलले!
2 अश्विन कसोटीत खेळण्याची शक्यता
3 गतविजेत्या चेल्सीचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X