क्रिकेटवीर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कधीच स्वत:ला खेळापेक्षा कधीच मोठे समजले नाही. असे भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मणने म्हटले आहे.
सचिनसोबत ‘१०’ नंबर जर्सीही निवृत्त!
लक्ष्मण म्हणाला, “माझ्यासाठी सचिन नेहमी महत्वाचा फलंदाज राहिला आहे. सचिनमध्ये तेजस्वी प्रतिभा असून, तो कायम खेळभावनेने खेळत आला आहे. त्याने नेहमी संघाच्या गरजांना प्राधन्य दिले आहे. दुखापतींवर मात करुन त्याने अनेकवेळा संघात यशस्वी पुनरागमनही केले आहे. त्याचा हा गुण प्रत्येक खेळाडूने घेण्यासारखा आहे. सचिनने आजवर अनेक विक्रम रचले असले तरी, त्याची वागणूक नेहमी नम्र राहिली आहे. तशी राखणे हे फार अवघड असते. प्रत्येक खेळाडू प्रमाण सचिन माझा आदर्श खेळाडू आहे.”
क्रिकेटच्या भल्यासाठी सचिनने आणखी कसोटी सामने खेळावेत!