क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एक महान फलंदाज आहे. त्याने अनेक विश्वविक्रम केले आहेत पण तो सुनिल गावस्कर इतका महान फलंदाज नाही. त्याला सुनिल यांच्यासारखी एकही खेळी करता आलेली नाही असे मत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुनिल गावस्कर एक उत्कृष्ट फलंदाज होते. त्यावेळचे वेस्ट इंडीचे गोलंदाज अतिशय भेदक होते आणि त्यांच्यासमोर फलंदाजी करणे हे अतिशय कठीण काम होते. कपिल देव येईपर्यंत भारताकडे चांगला वेगवान गोलंदाज नव्हता. सुनील यांच्या काळात झहीर अब्बास, माजिद खान, जावेद मियाँदाद हेदेखील चांगले फलंदाज होते. त्या काळातल्या फलंदाजांची सचिन तेंडुलकरबरोबर तुलना करणे योग्य नाही.
अब्दुल कादीर हे शेन वॉर्न व अनिल कुंबळेपेक्षाही चांगले गोलंदाज होते असे मत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी व्यक्त केले.