News Flash

सचिन-सारा आणि अर्जुनची एकत्र ‘योग’साधना

सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो

सचिन-सारा आणि अर्जुनची एकत्र ‘योग’साधना

संपूर्ण दिवसभरात आज योग दिवस साजरा केला जात आहे. आपल्या दैनंदिन जिवनात सृदृढ राहण्यासाठी योग करणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढाकाराने गेल्या काही वर्षांमध्ये योग दिवसाला ग्लोबल स्वरुप प्राप्त झालं आहे. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक सेलिब्रेटी, खेळाडूंनी योग साधना करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपली मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन याच्यासोबत योग करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. योगसाधना करत फादर्स डे साजरा करण्याचा प्रयत्न असं म्हणत सचिनने आपला फोटो पोस्ट केला आहे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आपआपल्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे ऑफिस, घर, कुटुंब या जबाबदारी पार पाडत असताना अनेकांचं त्यांच्या फिटनेसकडे दुर्लक्ष होतं. परिणामी, त्याचा आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर थेट परिणाम होत असतो. लठ्पणा, नैराश्य असे आजार हळूहळू जाणवायला लागतात. परंतु, या धकाधकीच्या जीवनात दररोज जीममध्ये जाणं प्रत्येकालाच जमत असतं नाही. अशावेळी काही वेळ योग साधना करणं शरिरासाठी गरजेचं असल्याचं मत अनेक डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 4:04 pm

Web Title: sachin posted a picture with his childrens doing yoga psd 91
Next Stories
1 टी-२० विश्वचषक रद्द झाल्यास आयपीएल नक्की खेळेन – डेव्हिड वॉर्नर
2 होय, माझ्याकडून दोनवेळा सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिलं गेलं ! – स्टिव्ह बकनर
3 Father’s Day 2020 : सचिन तेंडुलकर रमला बाबांच्या आठवणींमध्ये…
Just Now!
X