30 October 2020

News Flash

सारा, आम्हाला तुझा अभिमान वाटतो – सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण त्यापाठीमागे कोणतेही विवादास्पद कारण नाही. तर एक चांगले आणि अभिमानास्पद कारण आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून साराने मेडिसिनची पदवी मिळवली आहे. सचिनने मुलगी सारा हिच्या पदवीदान कार्यक्रमानंतर तिच्या आणि पत्नी अंजलीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. पदवीदान कार्यक्रमाचे फोटो सारानेही आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. पण सचिनने मात्र शेअर केलेल्या पोस्टमध्ये एका वडिलांना आपल्या मुलीबाबत वाटणारा अभिमान स्पष्टपणे दिसत आहे.

सारा मला आणि तुझ्या आईला तुझा खूप अभिमान वाटतो, असा संदेश सचिनने साराच्या पदवीदान समारंभानंतर दिला आहे.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल या शाळेतून साराने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर शालेय शिक्षणाची पदवी मिळवून पुढील पदवी मिळवण्यासाठी सारा लंडनला गेली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 9:51 pm

Web Title: sachin says me and anjali are proud of saras graduation at london
टॅग Sachin Tendulkar
Next Stories
1 खेळाकडे करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करा – मुख्यमंत्री फडणवीस
2 Ind vs Eng : पाच वेळा नाणेफेक हरल्यावर कोहली हताश, म्हणतो आता नाणंच बदला!
3 Blog : विराट, करुण नायरला इंग्लंड फिरवायला घेऊन गेला होतास का?
Just Now!
X