08 March 2021

News Flash

युनिसेफमध्येही आता सचिन ‘धुलाई’

आपल्या कारकीर्दीत सर्वच नामांकित गोलंदाजांना ‘धुलाई’ या शब्दाची व्याख्या शिकविणारा सचिन तेंडुलकर क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही ‘धुलाई’ची नवी कारकीर्द सुरू करणार आहे.

| November 29, 2013 01:37 am

आपल्या कारकीर्दीत सर्वच नामांकित गोलंदाजांना ‘धुलाई’ या शब्दाची व्याख्या शिकविणारा सचिन तेंडुलकर क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही ‘धुलाई’ची नवी कारकीर्द सुरू करणार आहे. कारण  क्रिकेटजगताचा लाडका तेंडुलकर आता युनिसेफचा स्वच्छता दूत होणार आहे. दक्षिण आशिया परिक्षेत्राचा पहिलाच ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून सचिन या विभागात स्वच्छतेच्या प्रसारासाठी काम पाहणार आहे.
ही दुसरी कारकीर्द सुरू करण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. युनिसेफचा दूत म्हणून काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. या कामाप्रती माझ्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्याचा मी प्रयत्न करेन.
ही नवीन कारकीर्द माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या भावना व्यक्त केल्या. गेली आठ ते दहा वर्षे युनिसेफशी विविध उपक्रम आणि योजनांसंदर्भात जोडल्या गेलेल्या सचिनची औपचारिकरीत्या दूत म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली.

‘जगातील असंख्य व्यक्तींना स्वच्छ प्रसाधनगृहाची व्यवस्था उपलब्ध नाही, हे वास्तव स्वीकारणे कठीण आहे. जागतिक लोकसंख्येपैकी ३६ टक्के व्यक्तींना स्वच्छ प्रसाधनगृह उपलब्ध नाही. आताच्या जगात लोकांना प्रसाधनगृहासारखी मूलभूत व्यवस्था उपलब्ध नाही ही गोष्ट पचनी पडणे कठीण आहे. योग्य स्वच्छतेअभावी असंख्य लहान मुलांना आपला जीव गमवावा लागत आहे हे यातनादायी आहे,’
          – सचिन तेंडुलकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 1:37 am

Web Title: sachin starts second innings to serve unicef as south asian ambassador
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 रोनाल्डोच्या गोलमुळे पोर्तुगाल क्रमवारीत पाचव्या स्थानी
2 चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : बायर्न म्युनिककडून नव्या विक्रमाची नोंद
3 महाराष्ट्राने आंध्रला रोखले
Just Now!
X