देशांतर्गत क्रिकेटमध्ये बलाढय़ समजल्या जाणाऱ्या मुंबई संघाचे मुश्ताक अली ट्वेन्टी-२० करंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान सलग तिसऱ्या पराभवानंतर संपुष्टात आले. या सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यानं मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यासह वरिष्ठ संघाकडून टी-२० सामन्यात खेळणारी सचिन आणि अर्जुन यांची पहिली भारतीय बाप-लेकांची जोडी बनली आहे.

हरयाणाविरोधात मुंबईनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईला १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. अष्टपैलू अर्जुन तेंडुलकराला सलामीच्या सामन्यात ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरवण्यात आलं. सचिन तेंडुलकर ९६ टी-२० सामन्यात खेळला आहे. सचिन तेंडुलकर यानं सर्वात खालील पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. २००९ आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना राजस्थानविरोधात सचिन तेंडुलकरनं पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्याशिवाय सचिन तेंडुलकर सलामीलाच फलंदाजी केली आहे.

अर्जुन तेंडुलकरने मुंबई संघातून पदार्पण केले, पण त्याला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. गोलंदाजी करताना अर्जुनला एक बळी मिळाला.