आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात स्पर्धेचे कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असतील. मात्र या सामन्यापूर्वी मुंबईचा मेंटॉर आणि मार्गदर्शक सचिन तेंडुलकरने आपल्या फलंदाजीचा नमुना सर्वांसमोर ठेवला आहे. सचिनने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर बॅटिंग करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सचिनच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने लिहिले, ”खूप कठीण आहे भाऊ, पण आशा आहे की संघात तुला जागा मिळेल.” सचिन आयपीएलच्या मागच्या हंगामासाठी यूएईमध्ये गेला नव्हता. रायपूरमधील रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजनंतर तो करोना पॉझिटिव्ह आढळला. सचिन २००८ ते २०११ पर्यंत मुंबई इंडियन्सचा कर्णधारही होता. सचिनने २०१३ मध्ये लीगला निरोप दिला होता. त्याच वर्षी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

 

 

 

 

हेही वाचा – IPL 2021 : मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी मांजरेकरांनी CSKला दिला सल्ला; म्हणाले, ‘‘रवींद्र जडेजाला…”

मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाने एक-दोन नव्हे तर पाच वेळा आयपीएलची चमकदार ट्रॉफी जिंकली आहे. मागील दोन्ही मोसमांचा विजेता देखील हाच संघ राहिला आहे. यावेळी संघाची नजर विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकवर आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

आयपीएल २०२१च्या पूर्वार्धात संघाची कामगिरी चांगली झाली आहे. ७ सामन्यांत ४ विजय आणि ८ गुणांसह मुंबई गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.