02 December 2020

News Flash

हार्दिक-नताशाला सचिनच्या खास शुभेच्छा, म्हणाला…

नताशाने गुरूवारी दिला गोंडस बाळाला जन्म

भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना गुरूवारी पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. गुरूवारी दुपारी हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांना ही गोड बातमी सांगितली.

हार्दिक नताशा आई-बाबा झाल्यावर क्रिकेट विश्वासह चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आई-बाबा झालेल्या हार्दिक-नताशाचं मन:पूर्वक अभिनंदन असं म्हणत त्याने नताशा-हार्दिकचे अभिनंदन केले.

हार्दिकने लॉकडाउनमध्ये आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची बातमी दिली होती. तेव्हा त्याने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. “मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास आनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत”, अशा भावना हार्दिकने व्यक्त केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 12:55 pm

Web Title: sachin tendulkar congratulate hardik pandya natasa stankovic blessed with baby boy vjb 91
Next Stories
1 ENG vs IRE : विजय इंग्लंडचा पण चर्चा आयर्लंडच्या कर्टीसची, कारण…
2 World Cup Super League : इंग्लंडने विजयासह उघडलं गुणांचं खातं
3 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा लांबणीवर?
Just Now!
X