भारताच्या १९ वर्षाखालील संघावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही व्हिडीओच्या माध्यमातून या नवख्या जग्गजेत्यांना शुभेच्छा तर दिल्याच आहेत मात्र खास सल्लाही दिला आहे. सचिनने ट्विट केलेला हा शुभेच्छांचा व्हिडीओ आठ हजारहून अधिक वेळा रिट्विट झाला असून ४१ हजारहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तर एकूण ९७ हजाराहून अधिक लोकांनी सचिननच्या या खास शुभेच्छा पहिल्या आहेत.

With Great Teamwork Big Dreams Work या वाक्याने सचिनने या व्हिडीओची सुरुवात केली आहे. म्हणजेच चांगला संघ एकत्र आला तर मोठी स्वप्न सत्यात उतरु शकतात. वर्ल्ड चॅम्पियन्सला खूप साऱ्या शुभेच्छा! आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय असे सचिनने या व्हिडीओत सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये सचिनने खेळाडूंबरोबरच भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघव्यवस्थापक पारस यांचेही विशेष अभिनंदन केले आहे. राहुल आणि पारसने उत्तम कामगिरी केली आहे. तुमच्या योगदानाबद्दल आणि या तरुण संघाला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद असे सांगतानाच तरुण खेळाडूंचेही अभिनंदन केले आहे.

तुमचा सुंदर प्रवास आत्ताशी सुरु झाला आहे असेच मी म्हणेल. अशीच सर्वोत्तम कामगिरी करत रहा. पण सर्वात महत्वाचे म्हणजे खेळाचा आनंद घ्या. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असे सांगतानाचा सचिनने हा २९ सेकंदाचा सेल्फी व्हिडीओ पोस्ट केला आहे.

पहा सचिनचा हा खास व्हिडीओ