28 February 2021

News Flash

सचिनचं हटके ट्विट; करोनाविरूद्धच्या लढ्याची केली भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीशी तुलना

तुम्ही पाहिलंत का त्याचं 'हे' ट्विट

गेल्या अनेक महिन्यांपासून देशवासीयांच्या नजरा लागलेल्या करोना लसीकरणाला आजपासून सुरूवात झाली. बहुप्रतिक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचं अभिनंदन करत जनतेला संबोधित केलं. “देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. यासाठी मी देशवासीयांचे अभिनंदन करतो. ज्याला लसीची सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सगळ्यात आधी करोना लस मिळेल. करोना योद्ध्यांना लसीसाठी प्राधान्यक्रम असेल,” असं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही या लसीकरणाबाबत भारतीयांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, त्याने केलेलं करोना आणि क्रिकेट यांची तुलना करणारं हटके ट्विट चांगलंच चर्चेत आहे.

सचिनने जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेसाठी भारतीयांना शुभेच्छा दिल्या. त्याचसोबत त्याने एक संदेशही दिला. “करोनाविरूद्धची लढाई म्हणजे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीसारखी आहे. दोघांच्या आयुष्यात खूप चढउतार आले, पण आपले फलंदाज फ्रंटलाइन करोनायोद्ध्यांसारखे खेळपट्टीवर टिकून उभे राहिले. आपण करोना योद्ध्यांचं आणि फलंदाजांचं अभिनंदन करूया. पण त्याचसोबत हेदेखील लक्षात असूद्या की लढाई आणि मालिका अद्याप संपलेली नाही त्यामुळे निष्काळजीपणा करू नका”, अशा आशयाचा संदेश त्याने दिला.

दरम्यान, क्रिकेटच्या मैदानात चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे चहापानानंतरचा खेळ रद्द करण्यात आला. तिसऱ्या दिवशी खेळ नियमित वेळेपेक्षा अर्धा तास लवकर सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची धावसंख्या दोन बाद ६२ असून पुजारा ८ तर रहाणे २ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा डाव ३६९ धावांवर संपल्यानंतर भारताला चांगली सुरूवात मिळाली नाही. शुबमन गिल अवघ्या सात धावा काढून माघारी गेला. रोहितने ४४ धावांची खेळी केली, पण तो देखील खराब फटका खेळत बाद झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 2:09 pm

Web Title: sachin tendulkar creative tweet compares corona battle with ind vs aus test match rohit sharma mumbai pm modi see tweet vjb 91
Next Stories
1 पूर्णपणे बेजबाबदार! गावसकरांनी रोहित शर्मावर व्यक्त केली नाराजी
2 Video: रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला लगावलेला ‘हा’ चौकार पाहिलात का?
3 IND vs AUS : ब्रिस्बेनमध्ये पावसाची बॅटिंग, दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द
Just Now!
X