News Flash

वॉर्नच्या भारतीय सर्वोत्तम कसोटी संघात सचिन, गांगुली

ऑस्ट्रेलियाचा माजी महान क्रिकेटपटू शेन वॉर्नने भारताच्या सार्वकालिक संघाची घोषणा केली आहे.

| December 17, 2015 02:56 am

वॉर्नच्या भारतीय सर्वोत्तम कसोटी संघात सचिन, गांगुली
सचिन- गांगुली

लेग स्पिनचा अनभिषिक्त सम्राट आणि ऑस्ट्रेलियाचा माजी महान क्रिकेटपटू शेन वॉर्नने भारताच्या सार्वकालिक संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये चौथ्या स्थानावर भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर माजी कर्णधार सौरव गांगुलीचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. फेसबुकवर वॉर्नने हा संघ जाहीर केला आहे.
वॉर्नने भारताच्या संघात वीरेंद्र सेहवाग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांना सलामीवीराचे स्थान दिले आहे. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भरवशाचा फलंदाज असलेल्या राहुल द्रविडला तिसरे स्थान दिले आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सचिन असून, पाचव्या क्रमांकावर गांगुली आहे. वॉर्नने या संघात भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनला सातव्या स्थानावर ठेवले आहे. पण व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला मात्र त्याने राखीव खेळाडू म्हणून स्थान दिले आहे. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही वॉर्नच्या या संघामध्ये आहे.
भारताचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांच्यासह जवागल श्रीनाथ हे या संघात दोन वेगवान गोलंदाज आहेत, तर अनिल कुंबळे, हरभजन सिंग
या फिरकीपटूंचाही समावेश केला
आहे.
वॉर्नचा सर्वोत्तम कसोटी संघ : वीरेंद्र सेहवाग, नवज्योतसिंग सिद्धू, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दिन, कपिलदेव, महेंद्रसिंग धोनी, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि जवागल श्रीनाथ. बारावा खेळाडू : व्ही.व्ही.एस. लक्ष्मण.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2015 2:56 am

Web Title: sachin tendulkar ganguly in warnes best indian test team
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 महाकबड्डी लीगमध्ये दीपिका जोसेफची चढाई
2 ट्वेन्टी-२० विश्वचषकात संधीची युसूफ पठाणला आशा
3 ऑस्ट्रेलिया संघाच्या सल्लागारपदी श्रीराम
Just Now!
X