मुंबई : भारताचा महान क्रि के टपटू सचिन तेंडुलकरने शनिवारी क्रीडापटूंच्या दुखापतींसंदर्भात १२ हजार युवा डॉक्टरांना मार्गदर्शन के ले.सचिनला दोन दशकांहून अधिक कालखंडाच्या कारकीर्दीत अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले. यापैकी कोपराला झालेल्या दुखापतीमुळे त्याची कारकीर्द संपुष्टात येण्याची चिन्हे होती. टाळेबंदीच्या निमित्ताने सचिनने डॉ. सुधीर वॉरियर यांच्या प्रयत्नांतून देशातील युवा डॉक्टरांशी वेबिनार्सच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील दुखापतींबाबत चर्चा के ली. दोनशे कसोटी आणि ४६३ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेल्या सचिनने आपले अनुभव त्यांच्यापुढे मांडले. प्रदीर्घ कारकीर्दीचे श्रेय वैद्यकीय क्षेत्रालाच जाते, अशा शब्दांत तो आभार मानायलाही विसरला नाही. सर्वसामान्य रुग्ण आणि क्रीडापटू यांच्यावर उपचार करतानाचा फरक सचिनने या सत्रात मांडला.