आयपीएलमधील गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची यंदाच्या हंगामासाठी ‘आयकॉन’ म्हणून नियुक्ती केली आहे.
‘‘सचिन मुंबई इंडियन्सचा ‘आयकॉन’ झाल्याने मी आनंदित आहे. सचिन ‘आयकॉन’ झाल्याने संघातील युवा खेळाडू आनंदित झाले असतील, कारण सचिनकडून नेहमीच त्यांना बरेच काही शिकता येत असते. सचिनकडून युवा खेळाडूंना नेहमीच मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. त्याचबरोबर संघाच्या चाहत्यांनाही हा निर्णय आवडेल,’’ असे मत संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी व्यक्त केले आहे.