07 August 2020

News Flash

सचिन की विराट? पाकिस्तानचा माजी खेळाडू म्हणतो…

पाहा तुम्हाला पटतंय का खेळाडूचं मत

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांची कायम तुलना केली जाते. सचिनने आपल्या २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले. आता विराटदेखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नवनवे विक्रम करत आहे. विराट कोहली हा सचिनपेक्षा धावांच्या आव्हानांचा पाठलाग करण्यात सरस आहे, असे मत काही दिवसांपूर्वी एबी डीव्हिलियर्स याने व्यक्त केले होते. तर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने सचिन आणि विराट यांच्या देहबोलीतील फरक सांगितला होता. त्यानंतर आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुल याने आपला आवडता फलंदाज सांगितला आहे.

“आतापर्यंत माझा आवडता फलंदाज हा सचिन तेंडुलकरच होता. पण विराट आल्यापासून मला त्याची फलंदाजी अधिक भावली आहे. गेल्या ४-५ वर्षात विराटने फलंदाजीत केलेली प्रगती पाहिली तर तुम्हीही माझ्या मताशी सहमत असाल. त्यानी स्वत:मध्ये आवश्यक ते सारे बदल केले असून स्वत:ला खूप विकसित केले आहे. सुरूवातीच्या काळात तो आमच्याविरूद्ध कसा खेळायचा हे मला चांगलं आठवतंय. त्यात त्याने खूप सुधारणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हल्ली त्यांने स्वत:चं लक्ष चांगली कामगिरीवर कशी करता येईल, यावर केंद्रित केलं आहे. तो ज्या पद्धतीची फलंदाजी करतो, तशी फलंदाजी पाहायला मला खूप मजा येते”, असे गुल म्हणाला.

“विराटचा एकंदर वावर खूपच हसता-खेळता असतो. तो एक-दोन वेळा माझ्यासारखी फलंदाजी करताना मला दिसला. पण महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात सचिनच्या खेळीची झलक दिसते. सचिनसारखाच तो जेव्हा फलंदाजीला उतरतो, तेव्हा संपूर्ण भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं त्याच्या खांद्यावर असतं. आणि तो ते ओझं अगदी सहज पेलतो”, असे पंच इयन गुल्ड म्हणाले होते.

“सचिन तेंडुलकर हा, विराट आणि मी, आम्हा दोघांचा आदर्श आहे. सचिन त्याच्या काळात ज्याप्रकारे खेळला आणि त्याने ज्याप्रकारे विविध विक्रम मोडीत काढले ती बाब वाखाणण्याजोगी आहे. त्याने युवा पिढीसाठी एक उत्तम उदाहरण ठेवले. विराटदेखील ही गोष्ट मान्य करेल. विराटपण हेच म्हणेल की सचिन एक सर्वोत्तम खेळाडू होता. पण वैयक्तिकरित्या मला असं वाटतं की जेव्हा आव्हानांचा पाठलाग करण्याची वेळ येते, तेव्हा विराट हा सचिनपेक्षा उत्कृष्ट आहे”, असे मत डिव्हिलियर्सने व्यक्ते केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 7:10 pm

Web Title: sachin tendulkar or virat kohli pakistan pacer umar gul reveals his favourite batsman vjb 91
Next Stories
1 सेहवागने शेअर केला घरावरून फिरणाऱ्या टोळांचा व्हिडीओ
2 पाकिस्तानचं चाललंय काय… करोना पॉझिटिव्ह १० पैकी ६ खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह
3 शोएबनं लाइव्ह चॅटमध्ये केलं माहिराशी फ्लर्ट; सानियाने मध्येच विचारलं…
Just Now!
X