भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने नुकतीच भूतानला भेट दिली. UNICEF ने सचिनला सदिच्छा दूत म्हणून नेमलं आहे. स्वच्छतेबद्दल जगभरात जनजागृती करण्यासाठी सचिन सध्या UNICEF च्या माध्यमातून कार्यरत आहे. या उपक्रमाअंतर्गत सचिन भूतानच्या दौऱ्यावर होता, यादरम्यान सचिनने भूतानच्या स्थानिक फुटबॉल व क्रिकेट मैदानांमध्ये लहान मुलांसोबत थोडा वेळ घालवला.

सचिनने भूतानचे हंगामी पंतप्रधान डाशो ट्शेरिंग यांची भेट घेऊन स्वच्छतेविषयी काय उपक्रम राबवता येऊ शकतात याबद्दल चर्चा केली. आपल्या या भेटीचे फोटो सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

यानंतर सचिनने फुटबॉल खेळणाऱ्या मुलांमध्ये काहीकाळ रमला.

याचदरम्यान सचिनने भूतानच्या स्थानिक क्रिकेट क्लबला भेट देऊन, तेथील खेळाडूंना मार्गदर्शन केलं.