17 November 2017

News Flash

सचिनच्या ‘या’ शब्दांमुळे भारावली मिताली राज

मिताली राजच्या खेळाचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

लोकसत्ता टीम | Updated: July 17, 2017 7:40 PM

सचिन तेंडुलकर ( संग्रहीत छायाचित्र )

भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताल राजचं कौतुक केलं आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन सचिनने मितालीला खास संदेश देत तिच्या खेळाचं कौतुक केलंय. ” तू एक उत्तम खेळाडू आहेस. मैदानात तुला खेळताना पहायला खूप आवडतं, नेहमी अशीच खेळत रहा”, असं म्हणत सचिनने मिताली राजचं कौतुक केलं आहे.

mitali-raj

सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषकात भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत मिताली राज सातत्याने चांगली खेळी करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत मिताली राजने आपण अजुनही फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. तिच्या शतकी खेळीमुळेच भारताला न्यूझीलंडवर विजय मिळवता आला.

मितालीच्या खेळाचं कौतुक करताना सचिनने आपल्या फेसबुक अकाऊंटवर लिहीलेला संदेश हा प्रत्येकाने खरच वाचण्यासारखा आहे.

सचिनच्या या कौतुकाला मितालीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आभार मानले आहेत.

या स्पर्धेत मिताली राजने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. वन-डे सामन्यांमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पार करणारी मिताली राजही पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याव्यतिरीक्त सर्वाधीक अर्धशतकांचा विक्रमही मिताली राजने आपल्या नावे केला आहे. आता उपांत्य सामन्यात भारताची गाठ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. त्यामुळे या सामन्यात मिताली आपल्या संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून देते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

First Published on July 17, 2017 7:40 pm

Web Title: sachin tendulkar praise indian ladies cricket team captain mitali raj on his facebook post