जगभरात सध्या एका छोट्या विषाणूने साऱ्यांना ‘लॉकडाउन’ केले आहे. करोनाच्या भीतीने सारं काही बंद आहे. भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धेचे आयोजनदेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. सर्व क्रिकेटपटू आणि सहाय्यक वर्ग सध्या आपापल्या घरी आहे. काही क्रिकेटपटू लाइव्ह चॅटमध्ये व्यस्त आहेत, तर काही क्रिकेटपटू टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ करत आहेत. या दरम्यान, जुने फोटो पोस्ट करण्याचा एक ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे. मुंबई इंडियन्सचा मेंटॉर (मार्गदर्शक) मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही जुना फोटो शेअर करण्याचा मोह आवरलेला नाही.

महेंद्रसिंग धोनी आणि मुंगूस बॅट… हेडनने सांगितला किस्सा

सचिनने आपल्या जुन्या फोटोंतून आठवणी जागवल्या आहेत. १९९२ मध्ये इंग्लंडच्या कौंटी क्रिकेट स्पर्धेत सचिन यॉर्कशायर संघातर्फे खेळला होता. इंग्लंडच्या वातावरणाचा नीट अंदाज यावा, या उद्देशाने सचिनने यॉर्कशायरशी करार केला होता. तेव्हा सचिन केवळ १९ वर्षाचा होता. सचिनने त्यावेळचे दोन फोटो शेअर केले आहेत. यॉर्कशायर संघाकडून खेळणारा विदेशात जन्मलेला सचिन पहिला खेळाडू होता. त्या आधी यॉर्कशायर संघाने कोणालाही संघात संधी दिली नव्हती.

IPL : ‘या’ संघासाठी आम्ही दोन-दोन तास ‘प्लॅनिंग’ करतो – रोहित शर्मा

पाहा सचिनचे खास फोटो

दरम्यान, आधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू रवी बोपारा याने स्वत:चा लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता, नंतर चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काही भारतीय क्रिकेटर्स एकत्र असलेला एक जुना फोटो शेअर केला होता. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार याने रोहित शर्मा आणि रैनासोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला होता. त्या पाठोपाठ भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन याने त्याच्या इन्स्टाग्रामवरून सुरेश रैनाचा एक फोटो शेअर केला होता.