27 February 2021

News Flash

‘नेहमी कोहली, रोहित आणि धोनीवर अवलंबून राहून चालणार नाही’, सचिन संतापला

उपांत्य फेरीत भारताचा पराभाव, विश्वचषकाचे स्वप्न भंगले

सचिन तेंडुलकर

मँचेस्टर येथे झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. या पराभवासह भारतीय संघाचे विश्वचषक विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताच्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने सामन्याचे आणि भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण केले आहे. प्रत्येकवेळा आपण आघाडीच्या फळीतील खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून राहू शकत नाही. इतर फलंदाजांनीही आपली जबाबदारी ओळखून खेळायला हवं.

उपांत्या सामन्यातील महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्या संघर्षपूर्ण खेळीचे सचिन तेंडुलकरने कौतुकही केले. परंतु भारतीय फलंदाजी ही नेहमीच आघाडीच्या तीन फलंदाजावर अवलंबून राहू शकत नाही असेही सचिनने म्हटले आहे. सचिन म्हणतो, ‘ भारताच्या पराभवामुळे मी निराश झालो आहे. २४० धावांचे लक्ष मोठं नव्हते. पण भारतीय फलंदाजांनी केलेल्या हराकिरीमुळे पराभवाला सामोरं जावं लागले. सुरूवातीलाच महत्वाचे तीन बळी घेऊन न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळवली होती. मधल्या फळीतील फंलदाजांनी आपल्या लौकीकास साजेशी खेळी केली आहे. ‘

आपण रोहित आणि विराट यांनी चांगली सुरुवात करुन पाया मजबूत करावा यासाठी त्यांच्यावर नेहमीच अवलंबून राहू शकत नाही. धोनीने नेहमीच विजयाने सामना संपवावा ही अपेक्षा सारखी सारखी करणे योग्य नाही. इतर खेळाडूंनीही आपली जबाबदारी ओळखून खेळायला हवं होतं, असेही तो म्हणाला.

भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेरीस संपुष्टात आलेलं आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. २४० धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ २२१ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताचे सर्व दिग्गज फलंदाज आज न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर ढेपाळले. अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता सर्वांनी निराशा केली. रविंद्र जाडेजाने ७७ तर धोनीने ५० धावा केल्या.  या पराभवासह भारताचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ३, मिचेल सँटनरने-ट्रेंट बोल्टने २-२ तर फर्ग्युसन आणि निशमने १-१ बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 9:41 am

Web Title: sachin tendulkar says india cant always rely on rohit and kohli others need to take responsibility nck 90
Next Stories
1 ..म्हणूनच धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवले: विराट कोहली
2 धोनी धावचीत झाला अन् सामना निसटला..
3 भारत धावचीत!
Just Now!
X