News Flash

Friendship Day : सचिन रमला बालपणीच्या आठवणीत

सोशल मीडियावर शेअर केला लहानपणीचा फोटो

देशभरात आज फ्रेंडशीप डे साजरा केला जात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्राचं स्थान हे मोठं असतं. आपल्या सुख-दुःखाच्या काळात मित्र हे नेहमी आपल्यासाठी धावून येतात. लहानपणी मित्रांसोबत खेळताना, त्यांच्यासोबत मजा-मस्ती करतानाच्या अनेक आठवणी प्रत्येकाच्या मनात असतात. आजच्या दिवशी प्रत्येक जण सोशल मीडियावर आपल्या मित्रांना फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा देतो आहे. अनेक सेलिब्रेटी आणि खेळाडूही यात सहभागी झाले आहेत.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही या निमित्ताने आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रमला आहे. साहित्य सहवास या आपल्या जुन्या घरातील लहानपणीच्या मित्रांसोबत खेळतानाचा एक फोटो सचिनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

मैत्री ही क्रिकेटच्या मैदानातल्या Flood Light सारखी असते. कोपऱ्यात राहून ते तुमचं यश एन्जॉय करतात. पण ज्यावेळी तुमच्यावर कोणतं संकट येणार असेल तर तेच पहिल्यांदा तुमच्यासाठी धावून येतात, अशा आशयाचा संदेश लिहित सचिनने सर्वांना फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 3:38 pm

Web Title: sachin tendulkar share childhood picture on eve of friendship day psd 91
टॅग : Friendship Day
Next Stories
1 २०१८ चा विजय आता विसरायला हवा, कांगारुंचा संघ यंदा तयारीनिशी उतरेल – अजिंक्य रहाणे
2 IPL 2020 : RCB कर्णधार नव्या हंगामासाठी सज्ज, मागवला नवा किट
3 हा देव आहे?? याची आता खैर नाही…जेव्हा शोएब अख्तर पहिल्यांदा सचिनला भेटतो
Just Now!
X