News Flash

चॅपेल वादावेळी सचिन माझ्या पाठीशी होता- गांगुली

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्या विरुद्धच्या वादावेळी सचिन माझ्या बाजूने उभा राहिल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे. सौरव म्हणाला,

| November 6, 2013 01:10 am

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्या विरुद्धच्या वादावेळी सचिन माझ्या बाजूने उभा राहिल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे.
सौरव म्हणाला, चॅपेल यांच्याबरोबर माझे मतभेद झाले. त्यावेळी सचिन खंबीरपणे माझ्या पाठिशी उभा होता. मला कसोटी संघातून वगळण्यात आल्यानंतर ही मी आणि चॅपेल यांच्यामधील संघर्ष असल्याचे मला वाटले. परंतु, काही महिन्यांनंतर मी संघात पुनरागमन केल्यानंतर चॅपेल व संपूर्ण संघाचे मतभेद असल्याचे मला आढळून आले होते. सचिन व चॅपेल यांच्यामध्येही वाद होते. असेही सौरव गांगुली म्हणाला.
 २००५-०६ मध्ये गांगुली आणि चॅपेल यांच्यातील वादविवाद प्रकरण भरपूर गाजले होते. यात गांगुलीला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर २००६ मध्ये गांगुलीची कसोटी संघामधूनही हकालपट्टी करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 1:10 am

Web Title: sachin tendulkar stood by me during the chappell controversy sourav ganguly
Next Stories
1 विराट कोहली @25
2 खेळाडूंसाठी प्रेरणादायी!
3 ..तर आनंदच जगज्जेता होईल!
Just Now!
X