भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने बॅट बनवणाऱ्या ऑस्ट्रेलियन कंपनीविरोधात कोर्टामध्ये दावा ठोकला आहे. सिडनी स्थित स्पार्टन्स स्पोर्ट्स कंपनी आणि सचिन तेंडुलकर यांच्यात २०१६ साली करार करण्यात आला होता. या करारानुसार सचिनचं नाव आणि त्याचा फोटो स्पार्टन्स कंपनी आपल्या उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी वापरणार होती. यासाठी प्रत्येक वर्षाला सचिनला अंदाजे ७ कोटी रुपयांचं मानधन देण्याचं ठरलं होतं. मात्र सलग दोन वर्ष कंपनीने सचिनला त्याचं मानधन न देता, त्याचं नाव आणि फोटो वापरणं सुरु ठेवलं आहे.

कंपनीसोबत झालेल्या करारानुसार सचिनने लंडन आणि मुंबई येखील एका कार्यक्रमात हजर राहून बॅटचं प्रमोशनही केलं होतं. सप्टेंबर २०१८ पासून मानधनासाठी कंपनीकडे पाठपुरावा करुनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर सचिनने आपल्या कायदेशीर सल्लागारांच्या मदतीने स्पार्टन्स कंपनीसोबतचा करार मोडला. मात्र यानंतरही कंपनीने सचिनचं नाव आणि फोटो वापरत आपलं उत्पादन सुरु ठेवल्यामुळे सचिनने कोर्टात धाव घेतली आहे.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
jharkhand marathi news, logistic company fraud
झारखंडमधील कंपनीची पावणेसहा कोटींची फसवणूक, लॉजिस्टीक कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’

अवश्य वाचा – धोनीचे चाहते आहात?? हे हॉटेल तुम्हाला देतंय फुकटात जेवण

सचिन तेंडुलकरच्या कायदेशीर सल्लागारांनी सिडनी येथील कोर्टात स्पार्टन्स कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. कोर्टाने २६ जूनला पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. दरम्यान यासंदर्भात सचिन आणि स्पार्टन्स कंपनीची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला, मात्र यावर कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.